गिर्यारोहक सागर विजय नलवडे ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित

sagar-nalawade

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर गावचे सुपुत्र गिर्यारोहक सागर विजय नलवडे यांनी सह्याद्रीसाठी दिलेले योगदान व गिर्यारोहण क्षेत्रात केलेली उत्तम कामगिरी याची दखल घेत त्यांना ‘ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज (बंटी) पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार दिला जातो.

brand-kolhapur

गिर्यारोहक सागर नलवडे यांनी आजवर सह्याद्री साठी दिलेले योगदान व गिर्यारोहण क्षेत्रात लिंगाणा सोलो आरोहण तसेच युरोप खंडातील रशिया येथील सर्वात उंच हिमशिखर माऊन्ट एलब्रुस व आफ्रिका खंडातील टाझांनिया येथील सर्वात उंच हिमशिखर माऊन्ट किलीमाजंरो सर करून जागतिक विक्रम करुन कोल्हापुरचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले आहे. याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज(बंटि) पाटील, भुषन गागराणी (प्रधान सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य) व आमदार रुतुराज पाटिल यांच्या हस्ते हाॅटेल सयाजी येथील कार्यक्रमात ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

जगातील सात खंडातील सात सर्वोच्च हिमशिखरे सर करण्याचे गिर्यारोहक सागर विजय नलवडे यांचे ध्येय असुन त्यांनी आतापर्यंत दोन खंडातील दोन हिमशिखरे सर केली आहेत. त्याचे पुढिल ध्येय जगातील सर्वात उंच शिखर माऊन्ट एव्हरेस्ट सर करण्याचे आहे. या कार्यप्रसंगी त्यांच्या माऊन्ट एव्हरेस्ट मोहिमेसाठी भारतीय ध्वज देऊन, लागेल ती मदत करण्याचे नामदार सतेज पाटिल यांनी सांगितले. तसेच मोहिमेस शुभेच्छा ही दिल्या. या प्रसंगी कोल्हापुर डिस्ट्रिक माऊटेनिअरिगं असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अमर अडके, दळवी आदि उपस्थित होते.

 

गिर्यारोहण क्षेत्रात कार्य करत असताना आजवर बरेच सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. पण आपल्या जन्मभुमी कोल्हापूर येथे आपल्या लोकांसमोर आपल्या लोकांनी दिलेली ही सन्मानस्वरुपी पाठिवरील कौतुकाची थाप पुढिल कार्य करण्यास आणखी बळ देईल. असे सागर नलवडे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here