जळगाव (प्रतिनिधी) – संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात असून फाउंडेशनचे कार्य हे जोमाने व्हावे यासाठी संस्थापक अध्यक्ष -मा श्री दत्ताभाऊ कदम आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. दिपकभाऊ ढवळे यांच्या सहमतीने त्याचप्रमाणे मा. रविंद्र काकडे, मा. अॅड. शेषराव गव्हाळे पूर्व महाराष्ट्र संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. सुरेश पाटोळे जिल्हाध्यक्ष जळगाव व मा. दिनेश भोळे उपजिल्हा अध्यक्ष जळगाव यांच्या संपर्कातून सुनील कडू भोळे यांची संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन सोशल मीडिया प्रमुख जळगाव जिल्हा पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन ( कार्यक्षेत्र संपूर्ण भारत ) पुर्व महाराष्ट्र कार्यकारिणी मध्ये व खान्देश कार्यकारणी मध्ये आपले स्वागत करीत आहे व आपल्या पुढील कार्यासाठी बुलंद पोलीस टाइम्स् परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.








