बीड (सुमित निसर्गध) – कोविड १९ च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील २५८ व्यक्तींचे गळ्यातील स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, आंबेजोगाई येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे.
२५८ स्वॅबमधील जिल्हा सामान्य रुग्णालय बीड २२, आंबेजोगाई ३, परळी ४८, माजलगाव १९, गेवराई १६, आष्टी १७, बीड ९५, आंबेजोहाई ३८ असा समावेश आहे.







