मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजावर कायम अन्याय होत आला आहे. या अन्यायाविरुध्द लढा देणारे महाराष्ट्र माळी समाज महासंघ-प्रदेश अध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषद – संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना निवेदन पाठवून या समाजावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात अनिल महाजन यांनी म्हटले आहे की, आपण पुरोगामी विचारसरणीचे नेते आहात आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.मागील देवेंद्र फडणवीस भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाजोती नावाची संस्था स्थापन करण्यात आलेली आहे.तसा शासन निर्णय ही झाला आहे. त्याचे मुख्य कार्यलाय पुणे येथे करण्यात आले होते. पण महाविकास आघाडी सरकारने हे कार्यालय नागपूर येथे हलवले आहे. ह्या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. राज्यात ओबीसी समाजाचा टक्का हा ६० टक्के आहे. ह्या महाजोती ह्या संस्था वर सर्वात अगोदर (1) IAS दर्जा चा अधिकारी एम डी म्हणून नेमावा., (2) महाजोती संस्थेचे कार्यलाय मध्यभागी पुणे येथेच ठेवावे., (3) ह्या महाजोती संस्थेला १००० कोटीचा निधी द्या., (4) राज्यभरात ह्या संस्थेचे विभागीय कार्यलाय सूरु करावे., (5) ह्या महाजोती संस्थेमध्ये सर्व मूळ ओबीसी अधिकारी यांची नेमणूक करावी. अशा सर्व मागण्यासाठी आपण राज्य सरकारला शिफारस करावी अशी आपणास संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने व महाराष्ट्र माळी समाज महासंघ प्रदेश अध्यक्ष तसेच ओबीसी जनक्रांती परिषद संस्थापक अध्यक्ष या नात्याने निवेदनात शेवटी विनंती केली आहे.







