जळगाव (निलेश पाटील) – रविवार गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावर सेवक सेवाभावी संस्था जळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.विनायक पाटील यांना जाहीर करण्यात आला.
कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोरोना योध्द्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला हा पुरस्कार देण्याचे सेवक सेवाभावी संस्था जळगाव अध्यक्ष विशाल शर्मा तसेच या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विनायक पाटील यांचे सेवाभावी कार्य पाहून निश्चित केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना विनायक पाटील म्हणाले की, कोरोनाच्या कठीण काळात कोरोना योध्दा म्हणून या संस्थेकडून कोरोना विरोधातील युध्दाच्या या सेवाभावी कार्याला जो सन्मान मिळाला त्यामुळे माझ्यासह संस्थेतील सर्वांना आणखी कार्य करण्यास मनोबल वाढेल आणि इतरांना प्रेरणादेखील मिळेल.
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विनायक पाटील यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Home Uncategorized धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव...







