देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्य वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

sharad-pawar

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – देशाचे नेते ना.शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १२/१२/२०२० रोजी सकाळी ९:३० वाजता शिरूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे

ashok-pawar

तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला नाट्यगृह हॉलमध्ये दाखवण्यात येणार असल्याची माहितीही आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.
शिरूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे रक्तदान शिबिर विद्याधाम प्रशाला नाट्यगृह हॉल, शिरूर ता. शिरूर जि.- पुणे येथे शनिवार दि. १२/१२/२०२० रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित केले आहे. सर्व सन्मानिय नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान करावे, रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचु शकतो त्यामुळे या रक्तदान शिबीरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. रक्तदान शिबीरास येताना, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here