मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – गुरूवार, दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी, कल्याण ( प ) येथे सागर इन्ट्रानॅशनल हाॅटेल, सरिता हाॅल, कल्याण स्टेशन जवळ आनंदश्री ऑर्गनायजेशन संस्थे मार्फत आयोजित कार्यक्रमात साहित्यिक, सामाजिक, पत्रकारीता व मानव अधिकार या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल डॉक्टर संतोष कांबळे यांना ‘महात्मा गांधी दर्शन पुरस्कार २०२०’ देऊन गुणगैरव करण्यात आला.

या सदर कार्यक्रमात, पद्मश्री डाॅक्टर विजय शाह (गांधीवादी), लक्ष्मण गोले (गांधी विचारवादी), डाॅक्टर संगीता गिरीश नाईक, मास्टर माईन्ड ट्रेनरचे सुदर्शन सबत इत्यादी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.







