हैदराबादमधील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; ८ कर्मचारी गंभीर जखमी

hyderabad-chemical-factory

हैदराबाद – तेलंगणमधील हैदराबादच्या बाहेर असलेल्या औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या परिसरातील बोल्लम येथील एका केमिकल फॅक्टरीत आज भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये ८ कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

याशिवाय, आणखी काही कर्मचारी फॅक्टरीत अडकलेले असण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.ज्या केमिकल फॅक्टरीत हा भाषण स्फोट झाला, त्याचे नाव विंध्य ऑर्गेनिक्स असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

स्फोटानंतर संपूर्ण फॅक्टरीतून मोठ्याप्रमाणावर धूर बाहेर पडत होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब पोहचले व आग विझवण्याचे काम सुरू झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here