धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – गॅस व पेट्रोल दरवाढ विरोध शिवसेनेच्या वतीने जोडे मार आंदोलन करण्यात आले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गॅस व पेट्रोल दरवाढीचा विरोध ,केंद्र सरकारचा व शेतकऱ्यांच्या आंदोलना विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजपा केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता (आण्णा ) साळुंखे शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव शिवसेना नगरसेवक रत्नकांत शिंदे, बळी गवारे शुक्राचार्य ढोरे, दत्ता रणभोर, दादाभराटे, शिवाजी कासार आदी उपस्थित होते







