चोपडा (महेश शिरसाठ) – येथील कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाबाबत करावयाच्या उपाययोजनां साठी समर्थ पॅलेस येथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक आ.लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती.या बैठकीत कोविड संसर्ग वाढवणार नाही याविषयी करावयाच्या उपाययोजनांबाबत उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांना सुचना केल्यात.
याप्रसंगी बोलताना मा.आ.चंद्रकांत सोनवणे यांनी प्रशासन चांगल्या प्रकारे कार्य करीत असून नागरिकांनीही प्रशासनाने बांधून दिलेले नियम पाळावेत तसेच कोविड रुग्णांसाठी आ.लताताई सोनवणे यांनी शासना कडुन मागणी केलेले १५ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून डिजीटल एक्सरे मशीन येत्या आठवड्यात प्राप्त होणार असल्याचे सांगितले.त्याप्रमाणे उर्वरित ५० बेडांसाठी ऑक्सिजन पाइपलाइन व सर्व सुविधायुक्त ५० बेड उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्या कडे पाठपुरावा सुरू असून या सुविधा चोपडा उपजिल्हा रुग्णालय तात्काळ मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रांत अधिकारी सीमा अहिरे मॅडम, तहसीलदार अनिल गावित साहेब, गटविकास अधिकारी बी.एस.कोसोरे, चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप लासुरकर,न.पा.चे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, चोपडा शहर पो. स्टे. चे पीआय.मनोज पवार, चोपडा ग्रामीण पो.स्टे चे पीआय संदिप आराख, अडावद पो.स्टे. चे पीआय योगेश तांदळे उपस्थित होते.







