जळगांव (निलेश पाटील) – कोरोनामुळे जळगावचे नाव महाराष्ट्रात गाजत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्रजी फडणवीस ह्यांनी जळगाव येथे भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या श्री.फडणवीस यांच्या जळगाव भेटीत त्यांची जैन हिल्सवरील आरामकक्षात भाजप वैदयकिय आघाडी तर्फे निवेदन देऊन जळगावात असलेल्या अनेक वैद्यकिय समस्यांबाबत लक्ष वेधण्यात आले तसेच ग्रामीण भागात येत असलेल्या अडचणी देखील सांगण्यात आल्या.
यावेळी डॉ धर्मेंद्र पाटील जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष व डॉ नरेंद्र ठाकूर ,उपाध्यक्ष जळगाव जिल्हा वैदकीय आघाडी ग्रामीण ह्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश भाऊ महाजन , विभागीय संघटन मंत्री किशोरभाऊ काळकर , खासदार उन्मेषदादा पाटील ह्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून अत्यंत व्यस्त वेळेतून ही भेट जैन हिल्स च्या आरामकक्षात झाली.

भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत आ.राजूमामा यांच्याकडे भेट
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे भेट दिली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह दिपक साखरे, विशाल त्रिपाठी, महेश जोशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेस एकूणच जिल्यात परिस्थिती कठीण आहे व यावर प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान कराव्या अशी विनंती श्री.फडणवीस व श्री.दरेकर यांना जळगाव जिल्हा भाजपा च्या वतीने करण्यात आली.







