आरोग्य सेवक व समाजसेवकांचा कोरोना योध्दा सन्मान

धुळे (प्रतिनिधी) – कासारे ग्रामपंचायत व लोकहित पत्रकार संघ धुळे तालुका कार्यकारिणीच्यावतीने कोरोना कालावधीत जनसेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या आरोग्य सेवकांचा व समाजसेवकांचा कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला आहे.
कोरोना योध्दा सन्मान देवून या समाजसेवक व आरोग्यसेवकांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न असून, कासारे ग्रा.पं. लोकनियुक्त सरपंच विशालभाऊ देसले यांच्या हस्ते समाजसेवक व आरोग्यसेवकांचा सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here