शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर झाली चर्चा
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे यांचे नेतृत्वात प्रतिनिधींनी गुरुवारी माजी मंञी आ.शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लक्ष घालण्याबाबत विनंती करून चर्चा केली.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षण सेवकांचे मानधन, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा सर्व प्रयोजनासाठी तसेच प्रथम नियुक्तीपासून वेतनवाढी गृहीत धरून पूर्वलक्षी प्रभावाने वरिष्ठ श्रेणी निश्चित करणे, MS-CIT उत्तीर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०२० पर्यंत मुदतवाढ देऊन वेतनवाढ अतिप्रदान म्हणून केलेल्या वसुलीचा परतावा मिळणे, शिक्षकांच्या मुख्यालयाचा आदेश रद्द करणे, सर्व विषय पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणे, जिल्हांतर्गत बदल्या बाबत सर्वसमावेशक धोरण निश्चित करणे, आंतर जिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट कार्यमुक्त करणे व आंतरजिल्हा बदली चा पुढचा टप्पा राबविणे,मा.न्यायालयीन आदेशाचा सकारात्मक अर्थ घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अग्रिम वेतनवाढी मंजूर करणे, शाळांच्या संयुक्त अनुदानात वाढ करणे, शाळांच्या विद्युत देयकासाठी स्वतंत्र तरतूद करणे, मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ करून प्रतिदिन ₹ २५ भत्ता मंजूर करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या मान्यतेसाठी पटसंख्येची अट संघटनांसोबत चर्चा करून निश्चित करणे,पटसंख्येचा विचार करून प्रति तुकडी शिक्षक संख्येचे नवीन निकष निश्चित करणे, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा समायोजित किंवा बंद करण्यात येऊ नये, सातव्या वेतन आयोगातील सर्वप्रकारच्या वेतन त्रुटी दूर करणे,आंतरजिल्हा बदलीने नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीची तारीख सर्व प्रकारच्या प्रयोजनासाठी ग्राह्य धरणे, उपशिक्षणाधिकारी पदासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पात्र धरणे, केंद्र प्रमुखांची सर्व रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत.शिक्षकांकडील बीएलओ ची कामे तात्काळ काढण्यात यावीत अशा अनेक प्रश्नांच्या संबंधाने मा. आमदार शशिकांतजी शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात आले.
सदर प्रश्न विविध विभागाशी संबंधित असल्याने त्या विभागासोबत पाठपुरावा करावा आणि विधिमंडळात अधिवेशनादरम्यान विषय लावून धरावेत अशाप्रकारची विनंती शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केली. आमदारांनी या बाबत सकारात्मक निर्णयाबद्दल आश्वस्त केले.यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे, प्रदीप कदम (सरचिटणीस सातारा जिल्हा), किरण यादव (संचालक शिक्षक बँक सातारा), सुरेश चिकणे (तालुकाध्यक्ष जावली),नितीन शिर्के (तालुकाध्यक्ष कोरेगाव), केंद्रप्रमुख विश्वास जाधव(सातारा),आर. टी.कदम (कोरेगाव), जनार्दन सावंत (कोरेगाव), रवींद्र भंडारे (सातारा), माने साहेब (माण) आदी सहभागी झाले होते.असे राज्य सरचिटणीस विजय कोंबे,राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी दिल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.
यावेळी औरंगाबाद शिक्षक समितीचे विजय साळकर(जिल्हाध्यक्ष)रंजित राठोड, (जिल्हा सरचिटणीस)नितीन नवले,शाम राजपूत,शालिकराम खिस्ते,गुलाब चव्हाण,विष्णू भंडारे,मोहंमद गौस,राजू ठाकुर,बबन थोरे,अशोक डोळस,के.के.जंगले,लक्ष्मीकांत धाटबळे,रऊफ पठाण,चंदू लोखंडे,अंकूश वाहूळ,राजेंद्र नागे पाटील,(पैठण तालुक्याचे नेते)कडूबा साळवे,के.डी.मगर,अर्जुन पिवळ,कैलास ढेपले,प्रकाश जायभाये,पंजाबराव देशमुख,दत्ता खाडे,जे.के.देशमुख,पंकज सोनवणे,सुनील बोरसे,मंगला मदने,शिलाताई बहादूरे,वर्षा देशमुख,वैशाली हिवर्डे,एन.एस.चव्हाण,बबन चव्हाण,विलास चव्हाण,निंबा साळुंके,जावेद अन्सारी,विलास साळुंके,अनमोल शिंदे,राजेंद्र वाघमारे,पद्माकर हुलजूते,संजय शेळके,जनार्दन मगर,राजेंद्र मुळे,अंकुश चव्हाण,दिपक बागूल, मच्छिंद्र निमोणे,अतूल गायके,उपस्थित होते.







