अंबरनाथमध्ये रेल्वेखाली दोघांचा मृत्यू

local-train-track

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर दोघांचा लोकलखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. मृत्युमुखी पडलेली तरुणी आणि तरुण नात्याने मामा-भाची असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हे आत्महत्येचे प्रकरण आहे का, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

अंबरनाथ पश्चिमेतील खुंटवली परिसरात राहणारा योगेश बेंडाळी (३२) आणि त्याच परिसरात राहणारी त्याची नातेवाईक प्रीती धादवड (२२) या दोघांचे मृतदेह शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे रुळांवर आढळले. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मृत्यू झालेले दोघे नात्याने मामा आणि भाची असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. शार्दूल यांनी दिली आहे.

 

हा प्रकार नेमका कसा घडला आणि मृत्यूचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या पोलीस तपास सुरू असल्याचे शार्दूल यांनी सांगितले आहे. मात्र मृत तरुण योगेश याने स्वत:च्या मोबाइलवर स्वत:ला श्रद्धांजली वाहणारे संदेश ठेवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here