रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – अध्यक्ष, जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांचे निर्देशानुसार व तालुका विधी सेवा समिती रावेर यांचे विद्यमानाने व आर. एल. राठोड अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, रावेर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ डिसेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय रावेर येथे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी कडिल प्रकरणांचे व दाखल-पुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतचे दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. तसेच लोकअदालत कशासाठी आयोजीत केली जाते व तीचा आपण कशा रितीने लाभ घेवु शकतो याबाबत सहा सरकारी अभियोक्ता अँड. प्रविण वारुळे यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.एल. राठोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सौ. वर्षा प्रविण पाटील (पो.पाटील), तसेच सहा.सरकारी अभियोक्ता अँड. प्रविण वारुळे व रावेर तालुका वकिल संघाचे उपाध्यक्ष अँड. जगदिश महाजन, सचिव, अॅड. भास्कर डी. निळे, सहसचिव अँड. धनराज डी. पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ अँड. सुभाष धुंदले, अँड. धनराज इ. पाटील, अँड. जितेंद्र दांडगे व इतर मान्यवर वकिल मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. जितेंद्र दांडगे यांनी व आभार प्रदर्शन अॅड. भास्कर निळे यांनी केले.
लोकअदालतीत आर. एल. राठोड, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती व दिवाणी न्यायाधीश क.स्तर रावेर, आर. एम. लोळगे सह.दिवाणी न्यायाधीश क.स्तर, रावेर यांचे असे एकुण दोन पॅनल ठेवण्यात आले होते. रावेर न्यायालयातील एकुण ठेवण्यात आलेले २४६ प्रलंबित प्रकरणापैकी एकुण ५ खटल्यांचा निपटारा करण्यात आला असुन त्यातील एकुण रक्कम रुपये ८,४०,०००. वसुल करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीचे, महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे, भारत दुरसंचार निगमचे, बँकेचे ठेवण्यात आलेल दाखलपुर्व एकुण ३२६४ प्रकरणापैकी एकुण ६४ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातुन तडजोड रक्क्म रुपये २,२८,२९९ वसुल करण्यात झाली.
सदर लोकअदालतीचे पॅनल नंबर १ चे पंच सदस्य म्हणुन ॲडव्होकेट दिपक एच. गाढे व पॅरा लिगल व्हालियंटियर सौ. सुनिता डेरेकर, पॅनल नंबर २ चे पंच सदस्य म्हणुन ॲड. भास्कर डी. निळे व रसुल हबीब तडवी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कर्मचारी ए.एम. सुगधींवाले (सहा अधिक्षक), पी.एस. निंभोरे(व.लिपीक), योगेश.एस. वैद्य(क.लिपीक), ए.एस. सोनवणे(क.लिपीक), के.बी. माने(क.लिपीक), डि.एस. डिवरे(क.लिपीक), एस.बी. जाधव(नाईक), बी.पी. चौधरी(शिपाई), किरण पाटील(शिपाई) यांनी सहकार्य केले.







