बुलंद पोलीस टाइम्स बातमीचा दणका : चिनावल येथे कॉक्रिटीकरण रस्त्याचे भुमीपुजन

raver-bhumipoojan

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर तालुक्यातील रस्त्यांनाही झाली कोरोनाची बाधा या मथळ्याखाली बुलंद पोलीस टाइम्सने बातमी प्रसारीत केली होती. या बातमीची दखल स्थानिक आमदार शिरीषदादा चौधरी यांनी घेतली आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल येथे स्थानिक विकास निधीअंतर्गत विकास कामाचे उदघाटन स्थानिक आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.या उदघाटन समारंभामध्ये मुस्लिम पंच कमेटीद्वारे आमदार शिरीषदादा चौधरी यांचा सत्कार मुस्लिम पंच कमेटीचे अध्यक्ष हयात खान व सदस्य इरफान मेंबर, शेख कलीम मेंबर,असलम खान,शेख कलीम न्याजू, शेख गुलाम, शकील खान, जाकीर सेठ, शेख साजीद, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून राजू पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष कॉंग्रेस, ज्ञानेश्वर महाजन तालुका अध्यक्ष कॉंग्रेस, सुरेखा नरेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य, आमदार चिरंजीव धनंजय चौधरी , दामोदर महाजन चंद्रकांत भंगाळे, किशोर बोरोले, किरण नेमाडे, संजू महाजन, डीगा महाजन, कल्पेश नेमाडे, योगेश बोरोले, संजू भालेराव सर, मनिषा कमलाकर पाटील, उषा रमेश चौधरी, शेख कयाम सेठ, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजू भालेराव सर यांनी केले तर निसार खान,मुस्तकीम शेख मोहसीन शेख, जुबेर शेख रमीज खान सर अज़ीम खान सर यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here