जळगाव (संपादक सुनिल पाटील) – माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री महा. राज्य लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई निवास येथे साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, दूध संघाच्या अध्यक्षा सौ.मंदाताई एकनाथराव खडसे, जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
यावेळी एकनाथराव खडसे यांनी स्व.मुंडे साहेबांच्या आठवणीना उजाळा दिला सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन खडसे यांच्यावतीने करण्यात आले समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ७५ कार्यकत्यानी रक्तदान केले . 
कै . गोपीनाथराव मुंडे चौकाचे नामकरण आमदार डॉ गुरुमुखजी जगवाणी , सुनिलभाऊ खडके (उपमहापौर मनपा जळगाव ) , ललितभाऊ कोल्हे (माजी महापौर मनपा जळगाव) , प्रशांत नाईक ( नगरसेवक मनपा जळगाव ), अशोक लाडवंजारी (माजी नगरसेवक मनपा जळगाव ) यांच्या हस्ते करण्यात आले 
यावेळी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, सुनिलभाऊ माळी माजी नगरसेवक. डॉ.अभिषेक ठाकूर, अनिल घुगे ज्ञानेश्वर वंजारी सागर पाटील सचिन इखे (लाडवंजारी ) रितेश लाडवंजारी , वैभव सानप , मंगेश नाईक , राहुल सानप , गजानन चाटे , योगेश नाईक , योगेश लाडवंजारी , चंद्रकांत घुगे , विक्रांत आहिरे , तेजस वाघ , ललित शर्मा , भिकन सानप , सचिन पाटील , इतर मुंडे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी. उपाध्यक्ष विजय लाडवंजारी, सचिव विनोद सानप, सदस्य पिंटूभाऊ सांगळे, उमेशभाऊ वाघ, कृष्णाभाऊ पाटील, आबाभाऊ ढाकणे , किरण वाघ, समाधान चाटे, पदाधिकारी कार्यकते वंजारी समाजातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








