धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या दहावीच्या २०१७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच शाळेत एकत्र येत आपल्या गतस्मृतींना उजाळा देत स्नेहसंवर्धन केले.आपले आवडते मराठीचे शिक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे मुख्याध्यापक झाले म्हणून त्यांचा सत्कार केला.संस्थेचे संचालक अजयभाऊ पगारीया हे अध्यक्षस्थानी होते तर या बॅचचे वर्गशिक्षक डी.एच.कोळी,गणिताचे शिक्षक यू.एस.बोरसे,के.आर.वाघ,एनसीसी मेजर डी.एस.पाटील, शिक्षक एस.के. बेलदार,सी.ए.शिरसाठ यांची उपस्थिती होती.
२०१७ च्या दहावीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळवणारा शाळेचा गुणवंत व आदर्श विद्यार्थी हर्ष उमाकांत बोरसे याच्यासह राहुल चौधरी, विशाल बिचवे या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली दहावी ब चा वर्ग सजविण्यात आला होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेचे संचालक अजय पगारीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी हलक्या फुलक्या आठवणी रंजकतेने सांगून हर्षोल्हास भरला. यू. एस. बोरसे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मुख्याध्यापक डॉ. सोनवणे यांचा सत्कार शुभम जाधव व ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी केला. तर उपस्थित गुरूजनांचा सत्कार विवेक सोळंकी, तुषार भोळे, मोक्षदा पवार, श्रद्धा कट्यारे, चेतना धनगर, इन्सीया साकी, भावना महाजन, उज्ज्वला सुतारे, कमलेश महाजन, वैभव पाटील, दिव्या पाटील, दामिनी धनगर यांनी केला. या स्नेहबंध कार्यक्रमास चाळीस माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. शाळेचा झालेला कायापालट पाहून हे माजी विद्यार्थी आनंदित झाले. कोरोना काळानंतरच्या या आनंदोत्सवात ती दिवसभर रमून गेली होती.







