प्रा. पी.एम.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : दिव्यांगांच्या समस्यांबाबत देणार लढा
धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – रविवार दिनांक 13/ 12 /2020 धरणगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रा.पी.एम.पाटील यांच्या हस्ते दिव्यांग संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळेस प्रा.पी.एम.पाटील यांच्या माध्यमातून अक्षय महाजन यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी तर संजय भाऊ पाटील यांची धरणगाव तालुका अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा विकास व प्रसार कशा पद्धतीने व्हावा याविषयी पी.एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दिव्यांग बांधवांनी सरांना दिव्यांगबद्दल समस्या बाबत प्रश्न विचारले असता, पी.एम.पाटील यांनी अतिशय पद्धतशीरपणे व सविस्तरपणे समस्यांचे निरसन केले. तसेच जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन आणि धरणगाव तालुका अध्यक्ष संजय भाऊ पाटील यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.

35 किलो धान्य, घरकुल योजना, व विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे 19 किंवा 20 या तारखेला धरणगाव शहरामध्ये दिव्यांग बांधवांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेटण्याची तारीख मिळाल्यानंतर हा मेळावा 19 किंवा 20 तारखेला आयोजित केला जाणार आहे. तसे सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यात येईल. अंत्योदय योजनेचे फॉर्म आपण आधीच वाटप केलेले आहे.तरी ते भरून त्यावेळेस सोबत आणावे. तसेच सोबत येताना प्रत्येकाने मास्क लावून यावे तसेच सोशल डिस्टनचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.







