कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
खंचनाळे गेले काही दिवस आजारी होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील एका सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. वृध्दापकाळ आणि कंबरदुखी व इतर काही व्याधीमुळे त्यांची प्रकृती अनेक दिवसापासून चिंताजनक बनली होती. काही दिवस डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र अखेर पंधरा दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.







