लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड कामाचा शुभारंभ; नगराध्यक्षांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांतर्फे शुभेच्छा

धरणगाव (योगेश पी. पाटील) – सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे लोक परेशान झालेले आहेत, केन्द्र व राज्य सरकार त्यांच्या त्यांच्या परीने कसोशीने प्रयत्न करीत आहेत, आपण सुद्धा समाजाचे व गावाचे काही तरी देणं लागतो, याच उद्देशाने कोणताही साथीच्या आजार, अपघात केस बरे होण्यासाठी अकरा बेड, आॅक्सिजन पाईप लाईन, मोठे जनरेटर, तसेच मल्टीपॅरामिटर, माॅनिटर, E C G मशीन, R O मशीन, पोर्टेबल एक्सरे मशिन अशा सुविधा करावयाचा आहेत.

आपल्या एरंडोल विभागाचे, विभागीय अधिकारी तथा कोविड 19 चे नोडल अधिकारी विनय गोसावी यांनी सांगितले कि गावातील राजकिय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, वकिल संघ, दुकानदार, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध संघटनां तसेच दानशूर व्यक्ती यांनी मदतीसाठी हातभार लावावा असे आवाहन केले आहे .

धरणगांव ग्रामीण रुग्णालयात हि सुविधा कोविड संपल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी होणार आहे. , या आवाहनाला प्रतिसाद देत आज धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या वाढदिवसां औचित्य साधून वरील कामाचे अंदाज पत्रक घेवुन कामाचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला, प्रांताधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रु 25000, गुलाबराव वाघ व शिवसेना धरणगाव 25000 रु, निलेश चौधरी लोकनियुक्त नगराध्यक्ष व शिवसेना नगरसेवक 25000 रु तसेच अधिकारी वर्गात प्रांताधिकारी विनय गोसावी 15000 रु, तहसिलदार 11000 रु, मुख्याधिकारी जनार्दन पवार 11000 रु असे ताबडतोब जमा करण्यात आले . अजून बाकीचे राजकीय पदाधिकारी सुद्धा या कामी मदत करणार आहे असे तहसिलदार धरणगांव यांनी म्हटले आहे, या कामाचं अंदाज पत्रकाचा शुभारंभ प्रसंगी विभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ, ज्यांच्या वाढदिवसाचा दिवशी केले ते धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ गिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष पी. एम पाटील सर , नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, विनय भावे, विलास महाजन विजय महाजन, राजेंद्र महाजन, संजय चौधरी, बाळासाहेब जाधव, राहुल रोकडे,वाल्मिक पाटील, अरविंद चौधरी, गोपाल पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here