क्रिएटिव्ह टीचर्स क्लब जळगावचे जिल्हा समन्वयक व प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांची आकाशवाणी वर मुलाखत

vijay-pawar

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – अरबिंदो सोसायटी दिल्ली यांचेतर्फे झिरो इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन पुरस्काराने केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयालजी यांच्या उपस्थितीत नुकतेच सन्मानित करण्यात आलेले शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची पुरस्काराच्या निमित्ताने आकाशवाणी जळगाव ने दि 10-12-2020 रोजी मुलाखत घेतली.

 

सदर मुलाखत दि 16-12-2020 बुधवार व दि 23-12-2020 बुधवार रोजी दोन भागात ‘लोकजागर’ या कार्यक्रमात रात्री 9 वाजता आकाशवाणी जळगाव केंद्रावर प्रसारित केली जाणार आहे.तरी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक, पालक, विदयार्थ्यांनी ही मुलाखत जळगाव आकाशवाणी वर ऐकावी असे आवाहन क्रिएटिव्ह टीचर्स क्लब जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here