संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याची काँग्रेसची टीका

sansad

नवी दिल्ली – देशभरात शेतकरी आंदोलनाचा आवाज घुमत असताना केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रसार टाळण्यासाठी केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशन रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पण काँग्रेसने आमच्याशी चर्चा करण्यात आली नाही असे म्हटले आहे.

 

sansad-winter-sesson

 

“सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली पण करोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले” असे प्रल्हाद जेशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. “करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयाचे महिने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे जोशी यांनी अधीररंजन चौधरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. करोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते.

 

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते. देशभारत आजघडीला करोना संक्रमितांची संख्या सुमारे १ कोटी होण्याची चिन्हे आहेत. या काळात कोणताही धोका टाळण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचा केंद्र सरकारने घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here