नवी दिल्ली – करोना लकेंद्र सरकारनंसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये करोना लसीकरण कसं केलं जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे.
दरम्यान करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे यांचा समावेश असणार आहे. १ कोटी आरोग्य कर्मचारी, २ कोटी कोविड योद्धे तर २७ कोटी सामान्य नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. प्रति दिवस एका सेशनमध्ये १००-२०० लोकांना लस दिली जाईल. त्यानंतर काही दुष्परिणाम तर होत नाही ना? हे पाहण्यासाठी त्यांना किमान ३० मिनिटं देखरेखीखाली ठेवलं जाईल. यासाठी 5 जणांची टीम असेल.जागेचे स्वरूप, लसीकरणाची क्षमता पाहून ती एकावेळी २०० जणांसाठी वाढवण्याचा देखील विचार केला जाऊ शकतो.
कोविड लसीच्या डिलेव्हरीसाठी खास डिजिटल प्लॅटफॉर्म केला जाणार आहे. यामध्ये लस दिल्या जाणार्यांचे ट्रॅकिंग केले जाईल.वोटर आयडी, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, पेन्शन डॉक्युमेंट यासारखी १२ महत्त्वाची कागदपत्र सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी निवडण्यात आली आहे. ती सादर करूनच सेल्फ रजिस्ट्रेशन करता येईल. प्री रजिस्ट्रेशन करूनच संबंधित व्यक्तींना लस दिली जाईल. यामध्ये ऑन द स्पॉट लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन नसेल. तसेच सरकारकडून प्राधान्यक्रमाने ज्यांना लस देण्यासाठी सांगितलं जाईल त्यांचाच या यादीमध्ये समावेश असेल.
एका तालुक्याला एकाच लस कंपनीच्या लसीची मान्यता असेल. यामुळे एका पेक्षा अधिक लसींचा गोंधळ होणार नाही. दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या औषधांच्या बाटल्या, थंडावा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणारे आईस पॅक्स यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. भारतातील कोरोना लसच्या तीन लसींवरील काम अंतिम टप्प्यात आहे. भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या युनिटमध्येही शेवटच्या फेरीची क्लिनिकल चाचणी घेण्यात येत आहे. सरकारने असे सूचित केले आहे की येत्या काही आठवड्यांत लसीच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.







