डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेला दमदाटी; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

dakin

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जुगणीचा पेचरीपाणीपाडा,ता.धडगाव येथे महिलेस तू डाकीण आहेस, माझ्या मुलास तूच मारून टाकले असा आरोप करून मारून टाकण्याची धमकी देत दमदाटी केली. या बाबत महिलेच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीसात ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधीत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील जुगणीचा पेचरीपाणीपाडा येथील यमनीबाई लाला वळवी या महिलेला तिच्या गावातील रायसिंग इरमा वळवी, बिंद्या इरमा वळवी यांनी रायसिंगचा मुलगा अनिल हा नवरात्री व दसरा सण दरम्यान शारीरिक आजाराने मरण पावला त्याचे वाईट वाटून यमनीबाईवर संशय व्यक्त केला. यमनीबाईस तू डाकीण आहेस, तू आमच्या मुलास जादूटोणा करून मारले, तू गावातून निघून जा असे आरोप करून शिवीगाळ केली,दमदाटी करत मारून टाकण्याची धमकी दिली. दरम्यान सदर भांडण हे गावातील लोकांनी बैठक बसवून मिटवण्याचा प्रयत्न केला पण भांडण मिटले नाही.

 

त्यावरून फिर्यादी महिलेने भावाशी, घरातील लोकांशी सल्लामसलत केली. त्यानुसार यमनीबाई लाला वळवी यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात रायसिंग इरमा वळवी, बिंद्या इरमा वळवी दोन्ही रा. जुगणीचा पेचरीपाणीपाडा,ता.धडगाव यांच्या विरूध्द भादंवी कलम५०४,५०६,३४,महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधीतअधिनियम कायदा कलम ३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान धात्रक,पो.हे.कॉ.दिलीप सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here