कर्नाटक विधानपरिषदेत राडा, अध्यक्षांना धक्काबुक्की

karnataka-vidhansabha

बंगळूर – कर्नाटक विधानपरिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला. गोरक्षा कायद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी सभागृहात अध्यक्षांच्या खुर्चीला घेराव घातला. तसेच विरोधकांनी अध्यक्षांना धक्काबुक्की केली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले.

 

हा गोंधळ एवढा विकोपाला गेला की भाजप आणि काँग्रेस आमदार एकमेकांना भिडले. सभागृह सभापतींना आमदारांनी खुर्चीवरून उचललं, आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. कॉलर पकडली. सत्ताधारी भाजपने विधानपरिषद सभापती प्रताप चंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या राज्यपालांच्या निर्देशानुसार एक दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं.

 

विधानपरिषदेत भाजपचं संख्याबळ कमी असल्यामुळे जेडीएसच्या साथीने भाजपने काँग्रेसच्या सभापतींना हटवण्याचा प्लॅन केला होता. अविश्वास प्रस्ताव मांडल्यामुळे विद्यमान सभापतींनी खुर्चीवर बसू नये अशी मागणी भाजप जेडीएसने केली होती. त्यांच्या जागी उपसभापती भौजेगौडा यांनी बसावं अशी मागणी करण्यात येत होती. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला आणि उपसभापतींना खुर्चीवरून काँग्रेस आमदारांनी उचललं. काही काळासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी नेते आक्रमक झालेले दिसून आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here