फुपनगरी येथे आर. ओ. प्लॉन्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – अशुद्ध पाण्यामुळेच बहुतांश आजार होत असतात त्यामुळे पिण्याचा पाण्याची योग्य तपासणी करूनच पाणी पिणे योग्य आहे . निरोगी आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्वाचे असून सोशल डिस्टसिंग, मास्क व हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री उपयुक्त आहे. सर्वांनी याचे पालन करण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले . नुकतेच फुपनगरी येथे आर.ओ.प्लॉन्टच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक बी. आर.बडगुजर होते.

यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यात शेती रस्त्यांना प्राधान्य देणार असून गाव विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. पाणी मुबलक जरी असले तरीही पाण्याची बचत करण्याचे आवाहन ना.गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी महिलांना शुद्ध पाण्याचे कार्ड ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी कृ. उ .बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, शेतकीसंघाचे रामचंद्र बापू पाटील, बी आर बडगुजर सर, भरत पाटील, विका सोसायटी चेअरमन मंगल पाटील, ग्रामसेविका अनिता सपकाळे, प्रशासक अजय सोमाणी सुनील सोनवणे,जयराम तात्या पाटील, भुजलचे उपविभागीय अधिकारी रविंद्र मोरे, ज्ञानेश्वर बडगुजर, यांच्यासह सर्व महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार श्यामकांत जाधव यांनी मानले







