महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन हेमंत सुधाकर सामंत आणि ३४ कोरोना योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान

coronayodhya-at-rajbhawan

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनच्या काळात आणि अद्यापही अनेकदा रक्तदान व प्लाझ्मा दान करून लोकांना जीवन दान देणाऱ्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या हेमंत सुधाकर सामंत आणि ३४ कोरोना योद्ध्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला .

 

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीतर्फे आयोजित या सत्कार सोहळ्यामध्ये पत्रकार, संपादक, समाजसेवी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व पोलीस कर्मचारी यांचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर, व्यावसायिक राहुल हजारे , तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here