हवेत फायरिंग करणारे ४ तासात गजाआड; शहर पोलिसांची तात्काळ कारवाई

जळगाव (संपादक सुनिल पाटील) देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केलेला असून, शहरात देखील दि. ७ जुलै ते १३ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यानुषंगाने जळगाव शहरात तसेच जळगाच शहर पो.स्टे हददीत बंदोबस्त लावण्यात आला होता.
१ जुलै रोजी सायंकाळी ७.०० जळगांव पो.स्टे हददीत ख्रिस्तीया पार्क वस्तीत हवेत फायरिंग झाल्याची चर्चा सुरु होती. जळगांव शहरात सर्वत्र फायरिंग झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यावर सुरक्षात्मक उपाय म्हणून पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलभ रोहन यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी भेट दिली होती. घटनास्थळीच पोलीस निरक्षक अरुण निकम यांनी डि.बी पथकास सुचना दिल्या व वेगवेगळे पथके तयार करुन सदर फायरीगचे आरोपी शोधण्यास सांगितले त्यानुसार पोना/११० अक्रम शेखा पोना/२१८२ गणेश शिरसाळे पोकॉ२९८१ सुधिर साळवे यांचे पथकाने सर्व अधिकारी घटनास्थळीच असतांना फायरिंग करणारे पैकी १)राज उर्फ बायु अशोक सपकाळे,रा.क्रांती चौक शिवाजी नगर जळगांव २) मिलींद सकट रा.गेंदालाल मिल जळगांव यांना पकद न । पोलीस स्टेशनला आणले त्यांचे कडून समजले की राजू उर्फ बाब अशोक सपकाळे, मिलींद सकट , मपुर उर्फ विकी आलोणे , इमाण उर्फ इम पूर्ण नाव माहित नाही असे सदर विहीरीजवळ रत्यावर बिअर पित। असलेले असताना सदर ठिकाणी दोन अज्ञात इसम तेथून जात असतांना मयर उर्फ विक्की अलोणे याने तुम्ही इकडे कोठे चालले ? असे विचारले असता त्यावरुन वाद होवून त्यांचेत आपसात मारामारी झाली त्यावेळी पिक्की अलोणे याने बिअरची बाटली फेकून मारली असता भांडण सोडवण्यास आलेल्या सुफियान शकिल वय-२२ रा. शिवाजी नगर हुडको जळगांव यास उजव्या डोळयाचे खाली लागल्याने त्यास जखम झाली आहे.
त्याच वेळी विक्की अलोणे याने त्याचे जवळ असलेल्या गावठी कटटयातून हवेत दोन जिवंत गोळ्या फायर केल्या व तो आता शिरसोली येथे असल्याचे बातमी पोना/४७ अक्रम शेख पोना/२१८२ गणेश शिरसाळे व पोकॉ/२९८१ सुधिर साळवे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी सफाँ/२ वासुदेव सोनवणे पोहेको/७४१ विजय निफंभ.पोहेकॉ/५४६३ महेंद्र पाटील, गणेश पाटील.पोना/सचिन वाघ, पोका/रतन गिते पोकों/प्रणेश ठाकुर पोकॉ/तेजस मराठे योगेश इंधाटे, सुनिल वाणी यांना तात्काळ रवाना करुन ते स्वतः पोलीस स्टेशनला थांबून थोड्या थोड्या वेळाने सदर पथकास फोन वरुन सुचना देत होते सदर पथकाने रात्री ०२.०० वा.स.शिरसोली रस्त्त्यावर विकी आलोणे रा.आर.वाय पार्क जळगाव इमाम उर्फ इमु असल्याचे समजल्याने सदर पथकाने त्यांचे जवळ अग्नी शस्त्र आहे असे माहित असतांनाही आपले जिवाची पर्वा न करता त्यास दोन गावठी कटयासह ताब्यात घेतले त्याचवेळी पोना अक्रम शेख यांनी पोलीस निरीक्षक निकम यांना सदर बातमी दिली म्हणून पोना/अक्रम शेख यांचे फिर्यादी परुन जळगांव शहर पो.स्टे भाग-५ गुस्न ११३/२० भादंवि कलम १८८,२६९.३२३,२२७.३४ । भारतीय हत्यार कायदा क.३/२५ व म.पो.अ.नियम ३७ (१) (३) चे उल्लघंन कलम १३५ प्रमाणे य आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आरोपी १)राज उर्फ बाबु । अशोक सपकाळे,रा.क्रांती चौक शिवाजी नगर जळगांव २) मिलींद शरद सकट रा.गेंदालाल मिल जळगांव, मयुर उर्फ विकी दिपक अलोणे,रा.आर.वाय पार्क जळगांव ४)इमाण उर्फ इमू शहा रशिद शहा रा.गेंदालाल। मिल जळगाव यांना सदर गुन्हयात गुन्हा घडल्यापासून ५ तासाचे आत दोन गावठी कटटयासह अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य शहर पोलिसांनी घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेऊन ५ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून आरोपींना मुद्देमालासह अटक केल्याने, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री दिपक बिरारी करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here