जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल जळगाव कोविड केअर युनिटचे जनसंपर्क प्रमुख फारुख शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी जळगाव कोविड केअर युनिटचे पदाधिकारी स्वतः हॉस्पिटलमध्ये फिरले. त्यांच्या या वैद्यकीय महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटलमधील भेटीचा आढावा त्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या नुसार डॉक्टर उल्हास पाटील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात ४०० कोविड व सस्पेक्टटेड कोविड पेशंट साठी बेड अधिग्रहीत असून ३५० बेड हे नॉन कोविड साठी अधिग्रहित असल्याची बातमी प्रसिद्ध झालेली होती तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ३५० बेड पूर्णपणे कोविड साठी राखीव आहे. गणपती हॉस्पिटल सुद्धा अगोदर घोषित करण्यात आले होते परंतु ते आता बंद करण्यात आलेले आहे.
रुग्ण जेव्हा भुसावळ वरून निघतो व तो गोदावरी हॉस्पिटलला जातो तेव्हा त्या ठिकाणी बेड शिल्लक नसल्याचे त्याला कळते व तो शासकीय महाविद्यालयात येतो याठिकाणीही बेड शिल्लक नसल्याचे कळल्यावर आता आपण कुठे जावे हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आपणास काल आम्ही आपणास पत्र दिलेले होते. आज आम्ही जळगाव कोविड केअर युनिट तर्फे गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे जाऊन प्रत्यक्ष प्रमोद भिरुड, आशिष भिरूड व डॉ वैभव पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्याकडे फक्त १०० ते १२५ बेड आम्ही कोविड व सस्पेक्टेड कोविड रुग्णांना देऊ शकतो त्यावर आम्ही जास्त बेड उपलब्ध करू शकत नाही कारण आमच्याकडे सर्व बेड आहे, मशिनरी आहे, ऑक्सिजन आहे परंतु ते हाताळायला तज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टॉप, व वार्ड बाय या मनुष्यबळाचा अभाव आहे.
सदर मनुष्यबळाचा अभाव असल्याने आम्ही संपूर्ण चारशे बेड सुरूच करू शकत नाही व सदर बाब आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलेली आहे. आजही आम्ही फक्त १०० ते १२५ बेड उपलब्ध करून देऊ शकतो त्यावर जास्त रुग्ण आल्यास त्यांना मनुष्यबळ नसल्याने ॲडमिट करूच शकत नाही. त्यामुळे हे स्पष्ट झाले की जे प्रसिद्ध झालेले आहे ४०० बेड ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी आजच्या तारखेला उपलब्ध नसून फक्त १०० ते १२५ बेडच त्या ठिकाणी उपलब्ध आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी जे बेड आहे ते शंभर टक्के कोविड साठी अधिग्रहित असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण रुग्णांचा भार या ठिकाणी असतो व त्या ठिकाणी लवकरच बेड फुल होतात त्यामुळे कोविड व सस्पेक्टेड रुग्णांना हा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी साहेब आजचा जळगाव जिल्ह्याचा कोविड बाधितांचा २९२ चा आकडा बघता भविष्यात आपणास अजून बेड, मनुष्यबळ व वैद्यकिय सेवेची गरज लागणार आहे.
आपण बेड वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते,आहे व राहणार यात शंका नाही परंतु आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आपण आपले कौशल्य पणाला लावून गोदावरी रुग्णालयात त्वरित मनुष्यबळासह त्यांची आर्थिक विवंचना सुद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.







