गोडाऊनवर टाकलेल्या छाप्यामध्ये 11 हजार लिटर बनावट डिझेल आणि एक टेम्पो जप्त
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – आज (दि.१७) बेकायदेशीर रित्या मिनिरल टरपेंट ऑईल व बेस ऑईल यांचे मिश्रण करुन त्यामध्ये रासायनिक रंग मिसळुन भेसळयुक्त बायो डिझेल या ज्वलनशिल द्रव्याची निर्मिती व साठा करुन विक्री करणा-या आरोपी विरूध्द गुन्हे शाखा,युनिट -३ कल्याण, ठाणे शहर यांची कारवाई केली असून, पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, मानपाडा भागातील आडवलीगांव भागता काही इसम बेकायदेशीर रित्या मिनिरल टरपेंट ऑईल व बेस ऑईल यांचे मिश्रण करुन त्यामध्ये रासायनिक रंग मिसळुन भेसळयुक्त बायो डिझेल या ज्वलनशिल द्रव्याची निर्मिती व साठा करुन त्याची अनाधिकृतपणे विक्री करित आहेत. या मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजु जॉन यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली उप नियंत्रक शिधावाटप ठाणे कार्यालयाचे पुरवठा अधिकारी एकनाथ पवार, राजेश पाटणकर, राजेश सोनार यांचेसह दि. १६/१२/२०२० रोजी पहाटे आडवलीगांव साई दिगंबर हौ.सोसायटीचे बाजूला बांधकाम सुरू असलेल्या गाळयात छापा कारवाई केली.
याठिकाणी ०५ इसम गाळयातील ५००० लिटर क्षमतेचे एकुण ०८ टाक्या एकमेकांना पी.व्ही.सी. पाईपद्वारे जोडून त्यामध्ये मिनिरल टरपेंट ऑईल , बेस ऑईल व नारंगी रंगाचे रसायन द्रव यांचे मिश्रण करुन भेसळयुक्त बायो डिजेल निर्मिती करीत असताना व गाळयातील टाक्यातून इलेक्ट्रीक मोटार द्वारे भेसळयुक्त बायो डिजेल EICHER कंपनीचा टॅकर आणि एक महेंद्रा पिकअप मधील टाक्यांमध्ये विक्री करता भरत असताना मिळून आले. सदर गाळयातुन व वाहनामधून सुमारे ९५०० लिटर बायो डिजेल व भेसळयुक्त बायो डिजेल निर्मीती करण्यासाठी लागणारे रसायन व इतर साहित्य तसेच भेसळयुक्त बायो डिजेल भरलेला EICHER कंपनीचा टॅकर आणि एक मेहेंद्रा पिकअप असा एकूण ३०,८६,७००/-रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मा. वरिष्ठांच्या आदेशानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.नं. ५१२/२०२० भा.द.वि.स. कलम ४२०,२८५ सह द मोटर स्पिरीट अॅन्ड हायस्पीड डिझेल (रेग्युलेशन ऑफ सप्लाय, डिस्ट्रीब्युशन ॲन्ड प्रिव्हेनशन ऑफ मालपॅक्टीस ऑर्डर २००५) उल्लघंन सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करून एकूण ०५ आरोपीतांना अटक करण्यात आली असुन,त्यांची दि. २१/१२/२०२० रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे. गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) . संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), लक्ष्मीकांत पाटील , सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) किसन गवळी, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सपोनि/भुषण दायमा, पोउनि/ नितीन मुदगुन, पोउनि/शरद पंजे, पोउनि/मारूती दिघे, पोहवा/मालशेटे, पोहवा/भोसले,पोहवा/चव्हाण, पोहवा/जोगमार्गे, पोहवा/पवार, पोहवा/थेरे, पोहवा/साळवी, पोना/पाटील, पोना/शिर्के, पोना/निकुळे, मपोना/इरपाचे, पोशि/राजपुत, पोशि/वानखेडे, पोशि/राठोड, पोशि/जरग, पोशि/शेकडे, चापोशि/ईशी यांनी यांचेसह केली आहे.







