महाराष्ट्र ग्रंथालय सेनेची सेना भवन येथे बैठक संपन्न

granthalaya-sena

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र ग्रंथालय सेनेची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील सेना भवन येथे नुकतीच संपन्न झाली. महाराष्ट्र शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्रातील सेना ग्रंथालय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाशी निगडित झालेले महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार व त्यांना मार्गदर्शन शिवसेना पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ज्याही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या सर्व समस्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोडविले जातील व आपल्या पक्षात मानाचे स्थान दिले जाईल जिल्ह्यातील सर्व बैठकीमध्ये आपल्याला सन्मानाने वागणूक दिली जाईल असे आश्वासन दिले.

प्रदेश प्रमुख बी जे देशमुख, सेना सहकार प्रमुख सौ शिल्पाताई सरपोतदार, प्रदेश उपप्रमुख पी एम पाटील सर, श्री पोकळे दादा यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्ह्यात लवकरच ग्रंथालय सेनेची कार्यकारिणी केली जाईल सर्वांनी कामाला लागावे.granthalaya-sena-meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here