ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विजय कदम यांची पेंशन वाढ मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना विनंती

sharad-pawar

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा वृतांत वाचण्यात आला असता. क्रीडा क्षेत्रातील प्रशासना मधील त्याच्या कार्यामुळे क्रिकेट मधील, वयोवृद्ध खेळाडूंना पेन्शनवाढ मिळवून दिली आहे. तरी खासगी क्षेत्रातील इ पी एस १९९५ मधील ६७ लाख ज्येष्ठ नागरिक समाविष्ट असून या पेंशनरांचे भविष्य निर्वाह निधी मध्ये ११ लाख करोड रुपये जमा असून, मागील २५ वर्षात त्यांच्यावर अन्याय होत आहे. तत्पूर्वी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोशियारी समितीची पेंशनवाढ मिळवून देतो. त्यांचे आश्वासन विस्मृतीत गेले आहे.

 

सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पेन्शनवाढ मिळावी, या संबंधी समन्वय समितीतर्फे मागील १० वर्षापासून पेन्शनवाढ मिळावी म्हणून मागणी करत आहेत. त्याकरीता दिल्ली पर्यंत मोर्चे,धरणे आंदोलन करीत आहेत. त्याचप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृह मध्ये कित्येक खासदार पेन्शनवाढी संबंधी सातत्याने मागणी करीत आहेत. तसेच खासदार हेमा मालिनी यांनी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पेंशन वाढीसंबधी मागणी केलेली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष , खासदार शरद पवार यांनी क्रिकेट खेळाडूंना आणि कुटुंबियांना पेंशन मिळवून दिली आहे.

 

केंद्र सरकारने कामगार कायदा पास करून घेतला , परंतु कृषी विषयक कायदा , शेतकऱ्याचं प्रखर विरोधामुळे नमते घ्यावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पक्षीय नेते मंडळी माननीय राष्ट्रपतींना भेटण्यास गेले असता त्याचे नेतृत्व खासदार शरद पवार यांनी केले होते. तत्पूर्वी करोना महामारीच्या काळात कित्येक ज्येष्ठ नागरिक मरण पावले आहेत. अशा देशभरातील भयानक परिस्थितीत इ पी एस ९५च्या पेंशनरांची पेन्शनवाढ महागाई भत्ता सह, विधवांना १००% पेंशन, वैद्यकीय मदत या संबंधीच्या मागण्या खासदार शरद पवार यांनी खास लक्ष घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे मिळवून दिल्यास करोडो पेन्शनर खासदार शरद पवार यांचे ऋणी राहतील.अशी विनंती ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार माननीय शरद पवार यांना केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here