अध्यक्ष पदी ह.भ.प.प्रदीप पाटील (गजानन महाराज ) वरसाडेकर यांची वर्णी.
धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत वृद्ध साहित्यिक कलावंताची निवड करण्यास्तव जिल्हास्तरीय निवड समिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी व जिल्हा सामाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष पदी ह.भ.प.प्रदीप विलास पाटील (गजानन महाराज वरसाडेकर ) याची निवड करण्यात आली आहे.
“राज्य शासनामार्फत सन-१९५४ -५५ पासून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ” ही योजना राबविण्यात येते. यां योजनेअतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्या विभागाच्या दिनाक-०९ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात दर वर्षी मानधनासाठी १०० पात्र कलावंतांची निवड केली जात असून प्रतिमहा रक्कम रु.२२५०/- प्रमाणे वार्षिक रक्कम रु.२७०००/- मानधन दिले जाते. सन-२०१९-२० व सन-२०२०-२१ या दोन वर्षात २०० कलावंतांची निवड करावयाची आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचार संहिता संपल्यावर जानेवारी अखेर पर्यंत सदर समितीची बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कलावंत मानधन जिल्हास्तरीय निवड समितीच्या अध्यक्षपदी- ह.भ.प. प्रदीप विलास पाटील (गजानन महाराज) वरसाडे ता.पाचोरा , सदस्य पदी- जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिकांमधून चंद्रकांत प्रभाकर भंडारी जळगाव, जिल्ह्यातील जेष्ठ कलावंतांमधून ह.भ.प. भाऊलाल रामभाऊ पाटील मुक्ताईनगर , विनोद डीगंबरराव ढगे जळगाव , दत्तुभाऊ नत्थूभाऊ सोनवणे भोकर ता.जळगाव यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे समिती सदर समिती गठीत करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार सदर समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या सदस्य सचिव पदी जि.प.चे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतील. वर्ग 1 चे अधिकारी सं. गां. नि. यो. चे तहसीलदार यांची सदस्य म्हणून तर जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी हे पदसिध्द सदस्य असतात.
या सदर समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व सदस्यांचे जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन पाटील जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग व वैद्यकीय सामाजिक अधिकारी भरत चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.







