शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – गुरुवार 17रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे मास्क न वापरल्याने विद्यार्थ्यास पोलिसांकडून विद्यार्थ्यास जबर मारहाण करण्यात आली असून जो पर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा देत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महिनाभरापूर्वी पोलीस प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱ्या विरोधात मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमे दरम्यान एका विद्यार्थ्याने मास्क न वापरल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली होती.अनेक वेळेस तक्रार व निवेदन देऊन देखील पोलीस प्रशासनामार्फत तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली म्हणून पोलीसांच्या या दंडुक शाही विरोधात घटनात्मक उपोषणाचा मार्ग पिडीत विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी स्वीकारला आहे आमचा घटनेवर विश्वास असुन जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी विरोधात कायदेशिर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे .
उपोषणास आज तिसरा दिवस उगवला पण प्रशासनाला आज हि जाग आलेली दिसत नाही अजुन किती दिवस प्रशासन झोपणार आहे हे कळायला मार्ग उरलेला दिसत नाही एक मोठी शौकांतीका दिसत आहे पोलीस प्रशासनाकडून उपोषण करणाऱ्याना समज देण्याचा तसेच लवकरच कार्यवाही करू असे मत Dysp यांनी व्यक्त केले परंतु संतप्त उपोषण करत्यानी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले यामुळे पोलीस प्रशासन आता काय कार्यवाही करणार ?हे बघून औत्सुक्याचे ठरेल .
उपोषण करणारे व सह्या करणारे पिढीतील चे वडील संजय पिंपळे, पिढीत मूलगा विकास संजय पिंपळे, पिढीतील ची आई वंदना संजय पिंपळे, आणि इतर नातेवाईक भगवान रामराज्य, कैलास महिरे, नरेंद्र महिरे, गणेश पेंढारकर, योगेश आहिरे,संतोष आहिरे,अ.पानपाटिल, भूराभाऊ महिरे, नथा महिरे, आणा महिदे, गणेश महिरे, राजु मोरे, अनिल साळवे, किशोर महिरे, आनंद ढोढरे आदी आहेत.







