शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुकातील मामाचे मोहीदे येथील शाळेकरी विद्यार्थी विकास पिंपळे या 19 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात पोलिसांतर्फे जबर मारहाण झाली होती संबंधितावर कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिडीत विकास पिंपळे वडील संजय पिंपळे व आई वंदना पिंपळे हे सोमवारपासून आमरण उपोषण करत होते
उपोषणाच्या चौथ्या दिवशी आमदार राजेश पाडवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले . दुपारी उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी पोलीस दलातील अधिकारी महसूल विभागातील अधिकारी आमदार पाडवी यांच्या सोबत बैठक झाली सदर बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्या यानंतर पोलीस प्रशासनातर्फे उपोषणकर्त्यांना कारवाईचे लेखी पत्र देण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी उपोषनकर्त्यांना दिलेला पत्राचा आशय असा- पिंपळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीची अर्जाची चौकशी नंदुरबार येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक करीत असून या चौकशीदरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील व रवींद्र सैंदाणे यांना 17 डिसेंबर पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे सलग्न करण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे उपनिरीक्षक कैलास माळी हे प्रशिक्षणासाठी धुळे येथे उपस्थित आहेत .सदर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने संबंधितावर येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.
जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र सोबत लिंबू पाणी देऊन पिंपळे कुटुंबीयांच्या उपोषणाची सांगता केली .पिंपळे परिवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांचे व विविध संघटनांचे पिंपळे कुटुंबीयांनी आभार मानले.







