जळगांव (संपादक सुनिल पाटील) – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे स्मृतिदिनी प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी व जनसेवा विचारधारा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.20 डिसेंबर 2020 रविवार रोजी तहसिल,जिल्हा परिषद परिसरातील डॉ.शामाप्रदास मुखर्जी उद्यानाजवळ गाडगेबाबा रोटी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.भुकेल्या व्यक्तीला अन्न या गाडगेबाबांच्या सुविचारातून प्रेरणाघेत प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी व जनसेवा विचारधारा फाऊंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने किमान 10 गरजवंत व भुकेल्या व्यक्तींना या अभियानाअंतर्गत दररोज नियमीत जेवणाची सेवा हे या अभियानाचा उद्देश आहे.राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन करून ना.बच्चूभाऊ कडू (राज्यमंत्री) यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत अभियानाची सुरूवात आजपासून करण्यात आली.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश बोरा,सागर गवळी, हरीष कमावत,जितेंद्र वाणी, अनिल नाईक, लक्ष्मण पाटील,धनंजय आढाव, किरण रूले, अनिल बिहाडे, कार्यक्रमाचे परिश्रम सजन भालेराव, राजेश खडके, कैलास जोशी,मुकेश करील, अध्यक्ष (सहयोग जनप्रबोधन आणि लोककल्याण), अरविंद काकडे,समाधान पवार,सिताराम भोई,अशोक लोहार आदिंनी घेतले.







