तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन
नाशिक कुबेर जाधव – कसमादे सह बागलाण ,देवळा तालुक्यात कोबी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आहे ,सध्या वातावरण थंड
असल्या कारणाने कसमादेचा शेतकरी जुन महिन्यात सुरवातीला विविध प्रकारच्या बियांनाची निवड करून गादी वाफे तयार करून त्यात टोकन पद्धतीने रोप तयार करून मग महीन्याच्या अंतराने लागवड केली जाते , साधारणता २१ दिवसा नंतर बियाणे लागवडीसाठी उपयुक्त होते , बागलाण तालुक्यातील दसवेल शिवारात या वर्षि मोठ्या प्रमाणात शेतकंऱ्यानी अँडव्हानटा गोल्डन सिड कंपनिचे युरो ;२ हे बियाणे लागवडीसाठी टाकले होते ,पंरूतु ८,१० दिवस उलटुनही ते बियाणेे न उगवल्या मुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले ,दसवेल येथील शेतकरी राजेंद्र निकम ,बाबाजी भामरे ,बापु भामरे,बाळूभामरे आदी शेतकंऱ्यानि प्रत्येकी ७० ते ८० पुड्या कमी जास्त प्रमाणात युरो ,२ या कंपनिच्या टाकून बियाणे उगवण्याची प्रतिक्षा करत असतांना ,बराच काळ उलटला तरी बियाने उगवले नाही हजारो रुपये खर्च करून सदर कंपनी चे बियाने घेतले परूंतु १०% ही उगवले नाही , त्यामुळे शेतकंऱ्यानी स्थानिक क्रुषी सेवा मार्फत कंपनिच्या अधिकांऱ्याना विचारना केली असता त्यांच्या कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपोरोक्त शेतकऱ्यानि तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांना निवेदन देऊन चौकशी करून संबधीत कंपनिवर कायदेशीर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करून निवदेन देण्यात आले .”इशारा महाराष्ट्रातील अनेक बोगस कंपन्या शेतकंऱ्याना बोगस बियाण्याचा पुरवठा करून हजारो रुपयांचा गं

डा घातला जातो आहे ,त्यामध्ये सोयाबीन ,कापुस आणि आता कोबी बियाणाची भर पडली आहे ,अशा बोगस बियाणे पुरवठा कर
णाऱ्या कंपण्यांचा शोध घेवुन कारवाई करावी अन्यथा सदर कंपनीच्या विरोधात तिर्व आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी दिला आहे.”







