छत्रपती क्रीडा मंडळ स्पोर्ट्स क्लबचे सल्लागार सतीश बनसोडे यांच्यामार्फत 2020 अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

chatrapati-karandak

ठाणे (विशेष प्रतिनिधी) – बुलंद पोलीस टाईम व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2020 अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजक छत्रपती क्रीडा मंडळ स्पोर्ट्स क्लब इंदिरानगर रुपादेवी टेकडी प्रभाग क्रमांक 15 वागळे स्टेट ठाणे या ठिकाणी आयोजित केली होती.

 

thane-cricket

स्पर्धांमध्ये पहिले बक्षीस सतीश बनसोडे संस्थापक,अध्यक्ष स्वप्न साकार प्रतिष्ठान, अध्यक्ष ठाणे शहर ( जिल्हा)महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, सह संपादक बुलंद पोलीस टाइम्स यांच्यातर्फे ट्रॉफी व रोख रक्कम 5000 रुपये देण्यात आली. दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस समाजसेवक मनोज यादव तसेच समाजसेवक महेंद्र सोडारी यांच्यातर्फे ट्रॉफी आणि रोख रक्कम 2500 रुपये देण्यात आले.

 

thane-sport

उद्घाटन प्रसंगी स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर, समाजसेवक विजेंद्र कदम, ज्येष्ठ नागरिक वसंत इंगळे, समाजसेवक राम अठवाल, समाजसेवक दीपक तुशाबर, समाज सेवक संतोष यादव तसेच, छत्रपती स्पोर्ट्स क्लब मंडळाचे सल्लागार सतीश बनसोडे, मंडळाचे कार्यकर्ते, हेमंत आग्रे,संतोष निकम, प्रशांत काळवागे, ओमकार चव्हाण, विजय यादव, देवेंद्र वर्मा, दिनेश इंगळे, नीराज तोडणकर,मनोज इंगळे, व इतर सदस्य यांनी हा कार्यक्रम मंडळाच्यावतीने आयोजित केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here