दराणे ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा

sangeetabai-pawar

लोकनियुक्त सरपंच संगीताबाई पवार यांचा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते सत्कार

शिंदखेडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील दराणे गाव येथे लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक आज दि. 22 डिसेंबर 2020 रोजी पार पडली. यात सरपंचपदी शिवसेनेच्या संगीताबाई शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती धुडकाबाई बाबुराव नंदाळे यांच्या अकाली निधनामुळे सरपंच पदाची जागा रिक्त होती.

 

darane-grampanchyat

नवनियुक्त सरपंच यांचा सत्कार शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला.

 

याप्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक शानाभाऊ धनगर, शिवसेना विभागप्रमुख मनोज पवार, ग्रामपंचायत सदस्य शितल रामकृष्ण पवार, गेंदीलाल चिंतामण पवार, रविंद्र धनगर, पोलीस पाटील जितेंद्र पवार, अशोक पवार, विश्वास पवार, रामकृष्ण पवार, प्रमोद पवार, ईश्वर धनगर, निलेश पवार, रोहाणेचे पोलीस पाटील कृष्णा वाघ, बुथप्रमुख सुकदेव बागुल, ग्रामसेवक जगदीश सोमवंशी, ग्रा.पं. शिपाई प्रेमसिंग गिरासे, गणेश गिरासे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here