कोरोना वॉरियर्स पुरस्काराने व सुरक्षित पुणे सुरक्षा मित्र पुरस्काराचे वितरण

pune-1

पुणे (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात अंतर्गत सुरक्षासेवा व बंदोबस्तामध्ये अप्रतिम अशी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोरोना वॉरियर्स पुरस्काराने व सुरक्षित पुणे सुरक्षा मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले या वेळी कैसर खालिद (भा .पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक , अनुप अवस्थी (अध्यक्ष लीगल राईट्स सोसायटी पुणे), संदिप टकले ( आदर्श सरपंच इंगळुन) व पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी -४ ) सर्व माननीय समन्वयक सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

pune-2

वाय एम.एम.सी.ए. मावळ येथे दिनांक १९/२० डिसेंबर रोजी दोन दिवशीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले, या चर्चासत्राला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा विषयक प्रश्नावर व्याख्याने आणि वेगवेगळ्या बैठका झाल्या. पुणे जिल्ह्यातील नामांकित सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या माध्यमातून सुव्यवस्था राखण्याच्या कामे जवळपास १३०० हुन अधिक सुरक्षा रक्षक संस्था मोठ्या प्रमाणावर कामकाज पाहतात. त्यात मा. पोलीस उप-अधीक्षक नवनीत कांवर (भापोसे) व सुरक्षा तज्ञ मा.सोमनाथ मारणे तसेच लीगल राईटस सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ चे चर्चासत्र पार पाडले.

खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेना जोडून काही नव्याने प्रयोग करून अधिक मोठ्या आणि सक्षम पद्धतीने अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला आहे. चर्चासत्रातून पुणे जिल्हा गुन्हे मुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या ९० मालकांनी टाकले. पुणे जिल्ह्यात काम करताना या पुढे गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत करणार आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ सुरक्षा रक्षक संस्थेचा वतीने देण्यात येणार आहे.

सुरक्षा रक्षक संस्थेचे मालक हे शासनाचा नियमा प्रमाणे काम करताना जनतेची सेवा करतील आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आम्ही पोलिस प्रशासनाचा पाठीशी खंबीर पणे उभे राहणार आहोत असे बैठकीतून निष्कर्ष झाला आहे. सदर चर्चासत्रात मोटिवेशनल व्याखाने आणि विविध विषयावर कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्यात गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी चर्चा घडून आल्या तसेच १ जानेवारी २०२१ कोरेगाव भीमा स्तंभ अभिवादन कार्यक्रमास पोलीस प्रशासनाला कोणत्याही पातळीवर पुणे-अहमदनगर रस्ता सुरक्षित करण्यासाठी पी-४ चे सर्व सहभागी संस्था मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसणार आहेत. पी ४ चे १०० पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक हे पोलीस प्रशासनासोबत बंदोबस्तासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून मदतनीस/ स्वयंसेवक पद्धतीने कामकाज पाहतील असा ठराव पास करून तशी यादी पोलीस प्रशासनाकडे देण्यात येणार आहे

या कार्यशाळेला आणि चर्चासत्राला मान्यवरांनी अनमोल मार्गदर्शन केले त्यात शासकीय नियमावली आणि त्यांच्या संदर्भातील माहिती या विविध विषयांवर मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आल्या. पोलीस सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ चे अध्यक्ष यांनी प्रस्ताविक केले व आयोजक मा.सरपंच संदीप टकले यांनी सर्वांचे आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here