शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रयत्नातून रूग्णांसाठी कार्यरत
पुणे (पंढरी गायकवाड) – वाघोली व परिसरातील लोकसंख्या व वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा
परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर कटके यांनी अतिशय कमी वेळात जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब तसेच पुणे महानगर आयुक्त साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून अतिशय लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
हे रुग्णालय वाघोलो येथील भारतीय जैन संघटना विद्यालय येथील हॉस्टेल मध्ये तयार केले आहे या मध्ये एकाच वेळी 250 रुग्ण उपचार घेऊ शकतात रुग्ण ने-आण करण्यासाठी ४ रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असणार आहेत व रुग्णालयामध्ये २४ तास डॉक्टर,फिजिशियन कार्यरत असणार आहेत त्याच बरोबर रुग्णालयाची दररोज निर्जंतुकीकरण करणारी यंत्रणा राबवली जाणार आहे रुग्णांची जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे
सदरील रुग्णालय सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून परवानगी आल्यानंतर त्वरित उद्यापासून कार्यरत करण्यासाठी आज दि.१०/०७/२०२० रोजी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी बैठक पार पडली.
त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, ज्ञानेश्वर कटके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात,महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.प्रकाश वाघमारे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.अशोक जाधव,शाखा अभियंता श्री.मखरे साहेब, वैद्यकीय अधिकारी वाघोली,डॉ .वर्षा गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते







