नातवानेच चोरले आजीचे सव्वा दोन लाखांचे दागिने; चौघांविरोधात गुन्हा दाखल

arrested

नगर (प्रतिनिधी) – दोन मित्रांच्या मदतीने नातवानेच आजीच्या पेटीमधील दोन लाख 32 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले. कल्याण रोडवरील शिवाजीनगरमध्ये असलेल्या भावनाऋषी सोसायटीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आजी पुष्पा सुरेश देशमुख (रा. शिवाजीनगर, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नातू शिरीष संजय देशमुख, भोल्या, कमलेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीष हा फिर्यादी पुष्पा देशमुख यांचा नातू असून तो त्यांच्याच घरामध्ये राहतो. शिरीष व त्याचे दोन मित्र भोल्या व कमलेश यांनी मिळून फिर्यादी यांच्या पेटीमधील दोन लाख 32 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांना शिरीष याचा संशय आल्याने फिर्यादी यांनी त्याच्याकडे चौकशी केली. परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार गाजरे करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here