नगर (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते मधुकरराव नवले यांनी आज मुबंई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री तथा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत भाजप मधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अगस्ति कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव मदन पथवे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी पं स सदस्य रमेश जगताप, आढळा विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर दराडे, रमेश पवार, एकनाथ सहाणे यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी आ.डॉ. सुधीरजी तांबे, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, सेवा दलाचे प्रांतिक अध्यक्ष औताडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव राजाराम देशमुख, मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डाॅ.राजु वाघमारे, महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षाताई रूपवते, प्रदेश काँग्रेसचे सचिव आबा दळवी, जिल्हा सेक्रेटरी शिवाजी नेहे, जिल्हा सहसेक्रेटरी आरिफ तांबोळी आदी उपस्थित होते.







