वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी वर्धा यांना निवेदन

vardha-teachers

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – तिन महिन्यांपासून सारी सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तसेच बऱ्याच कालावधीपासून नोडल अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा या मागणीसाठी मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020 ला जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

vardha-shikshan-samiti

यावेळी वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश जगताप, उपाध्यक्ष रामेश्वर लांडे, शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय सहकार्यवाह अजय वानखेडे, कार्यवाह सुरेश रोठे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह महेंद्र सालंकार , जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे व वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून सर्वांना कार्यमुक्त करण्याचे आश्वासन दिले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here