मुंबई (हितेश मिस्त्री) – मिरारोड पोलीस ठाण्याचे हद्दीत काल (दि.१० साईबाबा नगर, मिरारोड पुर्व येथे सध्या चालु असलेल्या कोविड १९ या आजाराचे दवाउपचार दरम्यान वापरण्यात येणारी (Remdesivir Injection) या औषधाची बॉटल एक इसम बेकायदेशीररित्या अधिक किंमतीमध्ये विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशिर माहिती डॉ.बीनू वर्गीस यांना प्राप्त झाल्याने पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, ठाणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, शांताराम वळवी, उप विभागिय पोलीस अधिकारी, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शानाखाली .संदिप कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिरारोड पोलीस ठाणे यांनी नियोजनपुर्वक छाप्याची आखणी करुन श्रीमती सपना सुरेश घुणकीकर, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन वागळे इस्टेट यांचेसह छापा कारवाईची पूर्व तयारी केली व पोलीस पथकाने १६.५५ वाजता साईबाबा नगर येथे बोगस ग्राहक व पंच हे औषध विक्री करण्यासाठी येणारे इसमांकडून औषध विक्री करीत असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकाने छापा कारवाई करुन औषध विक्री करण्यासाठी आलेल्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलेले आहे. सदर इसमाचे अंगझडती घेऊन त्यांचेकडील पिशवीची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात 04 – Covifor, Remdesivir injection, 100 mg/20ml हे मिळुन आलेले असुन एका इजेक्शनची मुळ किंमत ५४००/- रुपये असुन ४ इंजेक्शनची एकुण मुळ किंमत २१,६००/- अशी आहे.
वरील दोन्ही इसम व तपासात निष्पन्न होणारी इतर यांनी सध्या चालु असलेल्या कोविड १९ या आजाराचे दवा उपचार दरम्यान वापरण्यात येणारी वर नमुद औषधे बेकायदेशीर रित्या विना खरेदी बिलाने खरेदी करुन ती अधिक किंमतीने औषध विक्री परवाना नसतांना विक्री करुन फसवणुक करीत असतांना मिळुन आले म्हणुन श्रीमती सपना घुणकीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १ १६६/२०२० भादविसक ४२०, परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३, सह वाचन कलम ३ (२)(c) जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे उल्लंघन, दंडनिय कलम ७ (१) (a) (ii) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८ (c) चे उल्लंघन दंडनिय कलम २७ (b)(ii), कलम १८-B, व कलम २२ (१)(cca) चे उल्लंघन, अनुक्रमे दंडनिय कलम २८-A, व कलम २७(d) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास मिरारोड पोलीस ठाणे मार्फत वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड ठाणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील अपर पोलीस अधीक्षक ठाणे, शांताराम वळवी उप विभागीय पोलीस अधिकारी, मिरारोड यांचे मार्गदर्शानाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, पो.उपनिरी.प्रकाश कांबळे, पो.उपनिरी.किशोर राव, पो.उपनिरी. सुरेश पाटील, महिला पो.उपनिरी. स्वप्नाली पलांडे, पो.हवा.३००१/काळडोके, पोना३१४५/महेंद्र गिरासे, पो.ना.२९७३/ दिवेकर, पोना.१७२९/संतोष पाटील, पोना २८५५/अमोल फरकुटे, पोशि २४३६ विलास जाधव, पोना १६०१/विलास गायकवाड, पोना १५६३/संजय जाधव यांनी सहभाग घेऊन वरिष्ठांचे सुचनाप्रमाणे यश्वस्वीरित्या उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.







