यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – फैजपूर माजी नगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते निलेश भाऊ राणे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. सालाबादाप्रमाणे या वर्षीही निलेश भाऊ यांच्या संकल्पेनेतून तयार झालेल्या नवीन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज दि. २२/१२/२०२० रोजी संध्याकाळी फैजपूर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय या अध्यात्मिक संस्थेच्या आवारात पार पडला.
या वेळी सतपंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज, खंडेराव संस्थान चे गादीपती १००८ महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास जी महाराज, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शकुंतला दिदी, व मीरा दिदी यांच्या शुभ हस्ते २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी फैजपूर शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. निलेश भाऊ यांच्या २०२१ दिदर्शिकेच्या सोहळ्याला हनुमान जन्मोत्सवाचे अध्यक्ष वैभव भाऊ वकारे, बांधकाम व्यावसायिक ललित दादा चौधरी, मनोज भाऊ चौधरी, कुंदन चौधरी, करणी सेना अध्यक्ष अक्षयसिंह परदेशी, पवन भाऊ परदेशी, सचिन भाऊ चौधरी, योगेश साळी यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







