सत्तार पटेल यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद येथे तहसील प्रशासनाकडुन तालुक्यातील आणेवारी सर्वेक्षण करण्यात आले असुन या सर्वेक्षणात आणेवारी 50% पेक्ष्या जास्त दाखविल्याने शेतकरी वर्ग शासकीय योजनांपासून वंचित होण्याची दाट शक्यता होती.या दरम्यान भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे तालुकाध्यक्ष सत्तार पटेल लोणीकर यांनी प्रत्यक्ष तहसीलदारांची भेट घेऊन प्रशासनाची चूक लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
भाजपा अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष सत्तार पटेल यांनी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे आणेवारीतील चूक प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.या निवेदनात असे म्हटले आहे की,तहसील प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता.तालुक्यातील आणेवारी 46% तरu काही भागात 47% आणेवारी लावून तालुक्यातील आणेवारी 50% जाहिर केली.आणेवारी पन्नास टक्कयांपेक्षा कमी असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाईच्या विविध योजनेच्या लाभ मिळणार असल्याची आशा प्रलंबित झाली होती.ही बाब लक्षात येताच तहसीलदारांनी पुन्हा मंडळ अधिकारी तसेच तलाठ्यांना पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असुन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.







