खुलताबाद तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा सत्कार

kultabad-journalist

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – येथे पंचायत समिती सभापती गणेश नाना अधाने, उपसभापती प्रकाश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे पाटील, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, अविनाश कुलकर्णी यांच्या वतीने नुकतीच खुलताबाद तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी राजेंद्र बढे, कार्याध्यक्षपदी शेख जमीर, उपाध्यक्षपदी संतोष करपे, सचिव सयद इरफान, कोषाध्यक्ष सलमान खान सदस्य रमणलाल पंजाबी, विठ्ठल पाटे,शेख हबीब, ज्येष्ठ पत्रकार वसंता शिरसाट गल्लेबोरगांवकर, विजय चौधरी, अण्णा जाधव,शेख शरफोद्दीन, अतुल वेताळ यांच्यासह निवड झालेल्या सर्व नवनियुक्त सदस्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे शेवटी ज्येष्ठ पत्रकार वसंता शिरसाट यांनी आपला मनोगत व्यक्त करुन पत्रकारांचे मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here