कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी भारत दिघोळे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट

dada-bhuse

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ आठवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र दिले आहे त्याचबरोबर गेल्या 8 दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कांद्याची निर्यात बंदी तातडीने उठवावी यासाठी राज्य कांदा उत्पादन संघटनेकडून निवेदन पत्र दिले होते परंतु श्री फडणवीस यांच्याकडून केंद्र सरकारकडे कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी काही पाठपुरावा केल्याचे काही उत्तर न आल्याने श्री फडणवीस यांनाही आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कांदा संघटनेच्या शिष्टमंडळाकडून दुसरे पत्र देण्यात आले आहे.

 

onion-farmer-nivedan

 

कृषीमंत्री भुसे यांनी दिले केंद्रीय मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे आश्वासन
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी या मागणीसाठी येत्या 4-5 दिवसांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना दिल्लीमध्ये प्रत्यक्ष भेटून कांदा निर्यातबंदी ऊठविण्याण्यासाठी मागणी करण्यात येईल असे आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.यावेळी वरील मागण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्फत देण्यात आले आहे

onion-farmer

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, मालेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, देवेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे आदी शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here